क्षितिजाच्या कडेवर उगवलेला किरण
आकाशात कधीच विरून गेला...
स्वतःच्या अस्तित्वाची निशाणी ठेवत
एक रंगछटा मात्र रंगवून गेला...
वाळवंटात झालेला मृगजळाचा भास
असाच एकदा फसवून गेला.....
फसवूनसुध्दा आयुष्याच्या ठेवीत
जिद्दिचं बीज रोवून गेला.....
असाच तू येउन आयुष्यात
रंग स्वप्नांचे देऊन गेलास......
जाता जाता आठवणींत
तुझे प्रेम मात्र ठेवून गेलास.....

No comments:
Post a Comment